Menu Close

Maharashtra Mahabharti 2020 रिक्त जागा – 70000 Update

Maharashtra Mahabharti 2020 रिक्त जागा - 70000 Update 1

महाराष्ट्र महाभरती 70000 रिक्त जागा Latest Update

 

महाराष्ट्र महाभरतीचा तपशील ( Maharshtra Mahabharti All Details)

तारीख 31-01-2020

नमस्कार विद्यार्थी मित्रहो. तुम्हा सर्वांच मी मनापासून स्वागत करतो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

महा विकास आघाडी सरकार विभागातील तब्बल ७०,००० रिक्त पदांची महाभरती Mahabharti प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंदर्भातील चर्चा झाली आहे. सर्व विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला गेला. त्यामध्ये ग्रामविकास ,गृह, कृषी, पशु संवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगर विकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्त पद असल्याने तातडीने महा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जे कोणी सरळ सेवा चा अभ्यास करत असतील किंवा पोलीस भरती चा करत असतील किंवा आरोग्य विभागातील असतील तर त्यांच्यासाठी येणाऱ्या २०२० मध्ये ७०,००० जागांची मेघाभरती होणारच आहे .

बीजेपी सरकार मध्ये ७०,००० जागा भरण्याची घोषणा केली होती त्यातले फक्त ३२,००० जागा भरण्याची महा परीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आली. या नवीन महाविकास आघाडी सरकारने त्याला स्थगिती दिलेली आहे. आजच्या Topic वर आपण बघणार आहे की कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत हे आपण बघणार आहे. तुम्ही आणखी लेटेस्ट माहितीसाठी t.me/mahajobalerts टेलिग्राम सुद्धा join करू शकता.

Maharashtra Mahabharti 2020 रिक्त जागा - 70000 Update 2
Credits to Esakal.com

विद्यार्थी मित्रहो बघा आता पुन्हा एकदा महाभरती होणार आहे, ही खूप आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांसाठी. तलाठी भरती किंवा ग्रामविकास मध्ये ग्रामसेवक असेल किंवा प्रत्येक विभागातील ज्या जागांची भरती होणार आहे. त्याला कालच (२९ जानेवारी २०२०) मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.

जी भरती होणार होती त्याला आचार संहितेमुळे स्थगिती लावली होती, त्यामुळे असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की पोलीस भरती कधी होणार आहे. त्यांनी देखील आता तयारी करायला काय हरकत नाहीये, म्हणजे सध्याच्या या २०२० वर्षामध्ये बऱ्यापैकी जागा भरल्या जातील असे आश्वासनही दिलेला आहे, आणी मंत्रिमंडळामध्ये महाविकास आघाडीने मंजुरी दिलेली आहे.
 

माझे म्हणणे एवढेच आहे की तुम्ही तुमचा अभ्यास चालू करा. जागा निघणारच आहेत, तुम्ही कुठल्या जागेची वाट बघत बसू नका येणाऱ्या या 2020 मध्ये सगळे पूर्ण होणारच याची हमी आहे. बघा आता सध्याची Upcoming 70,000 जागांची भरती होणार होती त्याला स्थगिती दिली होती आचारसंहितेमुळे पण आता ती स्थगिती हटविली आहे. महापरीक्षा पोर्टल कडे परीक्षा घेण्याचे जबादारी होती त्याच्यावरती पूर्णपणे स्थगिती दिलेली आहे तेच सध्या हटवले आहे. आणि येणाऱ्या २०२० मध्ये कशा पारदर्शक परीक्षा घेता येतील यासाठी देखील त्यांनी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे.

आता कोणतीही जाहिरात निघायची वाट बघत बसू नका तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे करायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रहो बघा आता रिक्त जागांची स्थिती कशी आहे हे आपण आता खालच्या टेबलमध्ये बघूया

महाराष्ट्र महाभरती रिक्त पद तपशील ( Maharshtra Mahabharti Vacancy Details )

जागेचे नाव संख्या
ग्रामविकास विभाग११०००
गृह विभाग७१११
कृषी विभाग२५००
पदुम१०४७
सार्वजनिक बांधकाम८३३०
जलसंपदा८२२०
जलसंधारण २४३३
नगर विकास
१५००
आरोग्य१०,५६०

महाराष्ट्र मेगा भरती परीक्षा माहिती ( Maharashtra Mahabharti Exam Info)

पोलीस भरती असेल किंवा पीएसआयची असेल तर त्यामध्ये जाहिरात १००% मोठी असणार आहे. माझे सर्व मित्रांना एवढीच माझी विनंती आहे की आपली तयारी चांगल्या प्रकारे जास्त ठेवा. आहे बघा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील भरती कधी होईल वाट बघत न बसता जी आता मागच्या वर्षीच्या पण जाहिरात भरलेली आहे त्यामध्ये अजून त्याला महापोर्टल वर स्थगिती दिल्यामुळे कधी होईल अद्याप देखील अजून जाहीर झालेले नाही. पण येणारे २०२० मध्ये महाभरती होणार आहे. त्याच्यामध्ये मात्र  पोलीस भरती १००% होणार आहे याची गॅरंटी आहे. सध्या गृह विभागात ७१११ जागा रिक्त आहेत पोलीस भरतीसाठी भरपूर आहेत तेवढ्या.

तयारीला लागा आता कारण मागच्या वर्षीच्या ३२,००० जागाची अजून भरती झालेली नाहीये. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं तर कधी परीक्षा होणार आहे पण त्याची काहीच Notification नाहीये.

विद्यार्थी मित्रांनो जागा भरपूर आहेत त्यातली आपल्याला एकच पोस्ट मिळवायची आहे येणाऱ्या २०२० मध्ये. तुमची चांगली तयारी झाली पाहिजे विद्यार्थी मित्रहो आता कोणाची वाट बघत बसू नका व कुठल्या ही जाहिराती ची वाट बघत बसू नका. सध्या  मंत्रिमंडळाने एवढा निर्णय दिला आहे याचा अर्थ १००% ही भरती होणार आहे.

बघा आजची माहिती तुम्हाला नक्कीच महत्वाची वाटले असेल. जर तुम्हाला या माहिती मधून जरासही फायदा झाला असेल तर शेअर करायला विसरु नका. आणि कमेंट करायला विसरु नका. आपला टेलिग्राम चैनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.  https://t.me/mahajobalerts कारण येणाऱ्या वर्षात मी तुम्हाला अशीच माहिती देत राहणार आहे. मी जास्तीत जास्त माहिती या चेनल व वेबसाईटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

महाराष्ट्र महाभरती परीक्षा माहितीसाठी आमच्या सोशल Accounts ला कनेक्ट करा

1. Telegram

https://t.me/mahajobalerts

2. Facebook

https://facebook.com/mahajobalerts

3. Instagram

https://Instagram.com/mahajobalerts_

4. Twitter

https://mobile.twitter.com/mahajobalerts

5. HomePage

https://mahajobalerts.com/

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.